भयानक ! गौतम बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी भिख्खूने स्वतःचे मुंडके छाटले !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - मृत्यूपश्चात जीवनामध्ये पुण्य कमवण्याच्या आसक्तीतूनभगवान गौतम बुद्ध यांना प्रसन्न करण्यासाठी एका बौद्ध भिख्खूने तलवारीने स्वतःचे मुंडके तलवारीने छाटल्याची थरारक घटना नुकतीच घडली. थायलंडमध्ये 68 वर्षीय थम्मकॉर्न वांगप्रे यांनी तलवारीने स्वतःचेच डोके उडवले.
थम्मकॉर्न वांगप्रे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अघोरी प्रकार करण्याचा बेत आखत होते. गेल्या गुरुवारी 15 एप्रिल रोजी नोंग बुआ लम्फु प्रांतातील वट फू हिन मंदिरात ते मृतावस्थेत आढळले. त्यावेळी त्यांचे शिर पार्थिवाशेजारी पडलेले आढळले. वांगप्रे यांचा मृतदेह पुतण्या बुंचर्ड बूनरोड यांना सापडला. काकांच्या योजना लिहिलेली एक संगमरवरी लादीही त्यांना सापडली.
बौद्ध देवताच्या पुतळ्याशेजारी असलेली तलवार (गिलोटिन) त्यांनी वापरली. शरीरापासून विभक्त झालेले मस्तक भगवान बुद्ध पुन्हा जागेवर ठेवेल, या भाबड्या आशेतून त्यांनी हे कृत्य केले. या भिक्षूने 11 वर्षे मंदिराची सेवा केली होती. यापूर्वी त्यांनी इतर पुजार्यांना भिक्षुकी सोडण्याबाबत कळवले होते, परंतु शिरच्छेदाविषयी उल्लेख केला नव्हता.
मस्तक अर्पण करणे ही भगवान गौतम बुद्धांची स्तुती करण्याचा एक मार्ग आहे, असे आपल्या काकांनी एका पत्रात लिहिल्याचे बूनरोड म्हणाले. ते पाच वर्षांपासून ही विचित्र परंपरा प्रत्यक्षात उतरवण्याची योजना आखत होते. काकांची इच्छा होती की त्यांनी आपले मस्तक आणि आपला आत्मा अर्पण करावा, जेणेकरून बुद्ध आपल्या उच्च अध्यात्मिक व्यक्ती म्हणून पुनर्जन्म घेण्यास मदत करू शकतील, असंही बुनरोड म्हणाले.
भिख्खूच्या निधनानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदन तपासणी आणि मृत्यूचे कारण नोंदवण्यासाठी मंदिरातून रुग्णालयात नेला. पार्थिव अधिकाऱ्यांना परत केल्यानंतर 300 पेक्षा जास्त स्थानिक रहिवासी अंतिम संस्कार करण्यासाठी मंदिरात दाखल झाले होते.